श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलानिकेतन मालवण गुरुवंदना सोहळा २०२४ शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना सोहळा २०२४ या कार्यक्रमाचा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाध्यक्ष तथा कोकणरत्न बुवा भालचंद्र केळुसकर, भैरव जोगेश्वरी मंदिर अध्यक्ष डॉ. शंकर राऊळ, भैरव जोगेश्वरी मंदिर उपाध्यक्ष शरद मेस्त्री, ज्येष्ठ भजनी कलाकार परशुराम (प्रभाकर) मेस्त्री, उत्कृष्ट हार्मोनियम वादक स्वप्नील केळुसकर, अक्षय सातार्डेकर, पखवाज अलंकार महेश सावंत, तबला अलंकार धनंजय सावंत,पखवाज वादक विशाल केळुसकर, तबलावादक प्रसाद मेस्त्री, संगीत विशारद राजाभाऊ शेंडेकर, आदी हार्मोनियम वादक, पखवाज वादक, तबला वादक, विद्यार्थी, कलाकार हितचिंतक उपस्थित होते.

error: Content is protected !!