खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली तालुका मंडल ग्रामीण अध्यक्षपदी तळेरे येथील भाजप पक्षाचे पदाधिकारी तथा माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर यांची नुकतीच भाजप पक्षाच्या वतीने निवड करण्यात आल्याने त्यांचा विशेष सत्काराचा कार्यक्रम खारेपाटण येथील भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने खारेपाटण सोसायटी कार्यालयात नुकताच संपन्न झाला.
खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खरेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार व खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते भाजप पक्षाचे नवनियुक्त कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव माजी सरपंच रमकांत राऊत, किशोर माळवदे,इस्माईल मुकादम, खारेपाटण भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,भाऊ राणे,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले,अमिषा गुरव,मनाली होणाळे, दक्षता सुतार, शितिजा धुमाळे तसेच भाजप कार्यकर्ते शेखर शिंदे, प्रणय गुरसाळे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















