संविता आश्रमातील बांधवांनी संत राऊळ महाराज काँलेज माध्यमातून भामगिरी डोंगरावर केले उत्स्फुर्तपणे वृक्षारोपण

अणावच्या भामगिरी डोंगरावर केली १००० रोपांची लागवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या सविता आश्रम आणि शेल्टर होम द्वारे रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत असतानाच पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि परिसर स्वच्छतेसाठी कायम जागृकपणे भुमिका पाडली जाते.याच कार्याचा भाग म्हणून कुडाळचे संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि संविता आश्रमच्या संयुक्त सहभागाने नुकतेच अणावच्या भामगिरी डोंगरावर सुमारे १००० वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय व संविता आश्रमच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२५ वर्षातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम फलकाचे अनावरण काँलेजचे प्राचार्य अनंत लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.संत राऊळ महाराज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० विद्यार्थी आणि संविता आश्रमातील २५ बांधव आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे भामगिरी डोंगरावरील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.

संत राऊळ महाराज महाविद्यालयचे माजी विद्यार्थी व जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचेसह प्रा. भावेश चव्हाण,प्रा.उमेश कामत व प्रा.सभा शेख यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण मोहिमे दरम्यान मार्गदर्शन केले. तर कै.सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन केंद्राचे इन्चार्च आशिष कांबळी, संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत, संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, सोशल वर्कर माधव पाटिल , भक्ती परब, राज परब, नरेश आंगणे, पालव काका ,मयुरी परब , मयुरी आंगणे यांची मोहिमेच्या संयोजनात भुमिका राहिली.

error: Content is protected !!