शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खारेपाटण विभगापदी निखिल गुरव यांची निवड

आमदार वैभव नाईक यांचे शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खारेपाटण विभागप्रमुख पदी नुकतीच खारेपाटण संभाजी नगर येथील शिवसेना युवा कार्यकर्ते निखिल गुरव यांची शिवसेना पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते कणकवली येथील शिवसेना संपर्क कार्यालयात प्रदान करण्यात आले.

यावेळी आमदार वैभव नाईक,जिल्हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक,कणकवली तालुका प्रमुख महेश कोळसुलकर,संपर्क प्रमुख सतीश गुरव,युवा संपर्क प्रमुख तेजस राऊत,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्षाच्या वतीने नुकतेच पक्षात संघटनात्मक फेर बदल करण्यात आले असून काही युवक कार्यकर्त्यांना पक्ष वाढीच्या दृष्टीने जबाबदारी देऊन नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर शिवसेना कार्यकर्ते व खारेपाटण विभाग संपर्क प्रमुख सतीश गुरव यांचे निखिल गुरव हे बंधू असून खारेपाटण येथे ते शिवसेना पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.

शिवसेना हिंदुहृदसम्राट सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आमदार वैभव नाईक यांचे आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना माजी खासदार तथा शिवसेना पक्ष सचिव विनायकजी राऊत साहेब युवासेना सचिव वरून सरदेसाई,जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला जिल्हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक यांच्या सहिने नियुक्ती पत्र देण्यात आल्याचे नवनिर्वाचित खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख निखिल गुरव यांनी सांगितले. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!