कुडाळमध्ये भाजप-ठाकरे शिवसेना कार्यकर्ते आमने सामने !

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची!

कुडाळ (प्रतिनिधी) : नारळीपौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तरीही ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची कोंडी झाली. यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. याचवेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

error: Content is protected !!