प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये गोपनिय पद्धतीने झाले मतदान
फाेंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा नवीन कुर्ली येथील प्राथमिक शाळेच्या आवारातील हॉल मध्ये संपन्न झाली सदर ग्रामसभेला सर्व प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते. सदर सभेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय हे शाळेच्या वर्गखोली पूर्वी ज्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त संघटनेने चालू केले होते त्याच ठिकाणी शनिवार दिनांक २४/०८/२०२४ रोजी मा. प्रशासक श्री. सूर्यकांत वारंग यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच मीटिंग अजेंडा वरील विषय क्रमांक २ नुसार तंटामुक्ती समिती नेमण्यात आली सदर समितीच्या अध्यक्षपदी प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने श्री. प्रदिप लक्ष्मण कामतेकर यांची वर्णी लागली असून गोपनीय पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे इतर सदस्यांची देखील निवड करण्यात आली आहे.












