आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप नेते निलेश राणे यांच्या सुचनेनुसार चिंदर येथील संतोष लक्ष्मण गावकर यांची मालवण शहर प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.संतोष गांवकर यांनी यापूर्वी भाजपा तालुका उपाध्यक्ष,आचरा जिल्हा परिषद प्रभारी आचरा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अशी अनेक पदे भूषविली असून विद्यमान वैभवशाली श्री देव रामेश्र्वर पतसंस्था आचरा याचे संचालक,चिंदर तंटामुक्त अध्यक्ष म्हणून करत आहेत.
संतोष गावकर यांची मालवण शहर प्रभारी नियुक्ती झाल्याचे समजताच सर्व स्तरातून संतोष गांवकर यांचे कौतुक होत आहे.