तरंदळे गावातील महिलांची देवदर्शन वारी

सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचा सामाजिक उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील महिलांना देवदर्शन करता यावे यासाठी तरंदळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत आपल्या स्वखर्चातून महिलांसाठी दरवर्षी देवदर्शन वारीचे आयाेजन करतात.यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांच्यावतीने श्रावणी शनिवार चे औचित्य साधून तरंदळे गावातील महिलांना श्री.क्षेत्र कुणकेश्वर ते दाभोळे मंदिर तसेच तांबळडेक बीच,आचरा,आडवली स्वामी मठ, मुणगे गणपती मंदिर देवदर्शन वारी घडवून आणली.यावेळी सहभागी सर्व महिलांनी अमित सावंत यांचे आभार मानले.

देवदर्शन वारीचा शुभारंभ गावातील जेष्ठ नागरिक रमेश गावकर, तरंदळे सरपंच सुशील कदम, माजी सरपंच नम्रता देवलकर,माजी उपसरपंच रसिका सावंत यांच्या उपस्थितीत नारळ फोडून सुरुवात करण्यात आला.यावेळी अमित सावंत यांच्या या समाज कार्याबद्दल वनिता कदम,सरपंच सुशिल कदम,गिता मुणगेकर यांनी काैतूक केले.तसेच अमित सावंत यांनी हा चांगला उपक्रम राबवित आहेत.त्यांना उद्योग धंद्यात चांगले यश मिळूदे आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून घडूदे अशी मनाेकामना व्यक्त केली.अमित सावंत व गावातील महिलांना शुभेच्छा देण्यासाठी सरपंच सुशिल कदम,सुजाता मुणगेकर,अर्पिता घाडी गावकर, गणेश मुंबरकर, लहू जाधव,अमित सावंत,अनंत सावंत, संभाजी घाडीगावकर,देवा रावले,जयसिंग नाईक,अश्विनी चव्हाण,चिंतामणी तिरोडकर व गावातील महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!