कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका दैवज्ञ समाज तालुकाध्यक्ष मोहन तळगावकर आणि करंजे माजी सरपंच मंगेश तळगावकर, सुवर्णकार महेश तळगावकर यांच्या मातोश्री शारदा सदानंद तळगावकर यांचे 7 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चत मुलगे मोहन, मंगेश महेश सुना मोहिनी, विमल, माया तसेच नातवंडे गणेश शोभा,मनाली, अवधूत, सिद्धेश, दीक्षा, नातसून श्रद्धा, पणती सांवि गणेश तळगावकर असा परिवार आहे. भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्यावर करंजे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाणे करंजे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
करंजे माजी सरपंच मंगेश तळगावकर, दैवज्ञ समाज कणकवली तालुकाध्यक्ष मोहन तळगावकर यांना मातृशोक












