मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी
मालवण(प्रतिनिधी):कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामध्ये तेरई जोड रस्ता (ग्रा. मा. ५८ ) ४.३०० कि.मी. साठी ६ कोटी १० लाख रु., आनंदव्हाळ कातवड नांदरुख रस्ता ( ग्रा. मा.२७८) ३ कि.मी.साठी २ कोटी ४० लाख रु., किर्लोस आंबवणे खांदारवाडी रस्ता ( ग्रा.मा.११९,१२०) २.५०० कि.मी.साठी २ कोटी ४२ लाख रु., खैदा साळकोंबा नांदरूख रस्ता ( ग्रा. मा.-२४६) २.६०० कि.मी.साठी १ कोटी ९८ लाख रु., मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्ता ( ग्रा. मा. ९१) ३.५०० कि.मी.साठी ३ कोटी ८ लाख रु.हि कामे मंजूर झाली असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ८ मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.