मणचे येथे कृषीदूतांमार्फत ‘कृषी मेळावा व कृषी मार्गदर्शन कार्यक्रम

तळेरे (प्रतिनिधी) : कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, ता. वैभववाडीयांच्यावतीने ‘ ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत मालपे ता.देवगड गावातील कृषीदुतांनी भव्य कृषी मेळावा व रानभाजी प्रदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची शेतीची अवजारे, विविध पिकांच्या नवनवीन जाती व त्यावरील पडणाऱ्या रोगांची माहिती, व कोकणातील फळ पिके आंबा, काजू, नारळ व्यवस्थापन व त्यावरील उपाय शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक तोरस्कर (सरपंच मनचे), सिंधू वसुंधरा ऍग्रो कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र काडगे , फार्मर प्रोडूसर कंपनी अध्यक्ष श्री.सुनील पाळेकर, जि.प.प्राथ. शाळा मनचे मुख्याध्यापक चिंतामणी पवार व सर्व प्रगतशील शेतकरी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हा कार्यक्रम मालपे गावातील कृषीदूत श्रीकांत जाधव,विकास पवार ,सार्थक जगताप ,आदित्य कुडले,समर्थ जाधव,प्रणव खरतोडे ,वृषभ चिकणे यांनी आयोजित केला होता, प्रशिक्षणार्थींना विद्यालयाचे प्राचार्य डॉ.स्वप्निल होळकर.श्री.विवेक कदम(कृषी विस्तार अधिकारी) श्री. तेजस गायकवाड (कार्यक्रम समन्वयक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!