मिना सोनु … या उत्तरप्रदेशातील युवतीचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

संविता आश्रमच्या टिमने गुगल सर्चद्वारे शोधले मनोरूग्ण युवती….मिना सोनुचे गाव

पाच महिन्यांपुर्वी तालुका जिल्हा आगरा येथून हरवली होती महिला

खारेपाटण ( प्रतिनिधी) : मिना सोनु वय वर्षेः ३८ ही युवती उत्तरप्रदेशातील देहतोरा मोड, नितेशनगर नई आबादी,बोदला,तालुका व जिल्हा आगरा येथून पाच महिन्यांपुर्वी ९ मार्च २०२४ रोजी मानसिक आजारी अवस्थेत घरातून भरकटली होती. नुकतीच तीन दिवसांनी ती थेट कणकवलीमधे पोहचली.दि.१२ मार्च २०२४ रोजी कणकवली पोलीस स्टेशनद्वारे संविता आश्रमात दाखल करण्यात आलेल्या मिना सोनु हिला तीचे पती सोनु व वडिल किशोरी राम यांच्या ताब्यात देवून कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले.

मिनाच्या कुटुंबियांनी तिचे माहेरचे घर असलेल्या आग्रा जिल्ह्यातील जगदिशपुरा पोलीस स्टेशनमधे दि.१० मार्च २४ रोजी मिसिंग दाखल करून ता.जि.आग्रा व गावः बेदई तालुका सादाबाद जिल्हा .महामायानगर (जुने नावः जिल्हा हाथरस) परिसरात खूप शोध घेतला. पण शोध घेऊन काही सापडत नव्हता. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग सह गोवा राज्यात रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी करू करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब हे त्यांच्या टिमसह गेले. संदीप परब हे ११ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत.तर त्यांचे सहकारी विश्वस्त किसन चौरे व संविता आश्रमच्या टिमने मिनाने दिलेल्या त्रोटक माहितीवरून तीन महिन्यांहून अधिक काळात तीच्या मु.बेदई ता.सादाबाद जि.महामायानगर या सासरच्या गावामधे गुगल सर्च आधारे वारंवार शोध घेतला. व अखेरिस मिनाच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यात यश मिळविले.

संविता आश्रमा तून गुगल आधारे मिनाचे गाव व कुटुंबियांचा शोध घेवून पुनर्मिलन करण्यासाठी गेले तीन महिन्यांहून अधिककाळ सुरू असलेल्या प्रक्रीयेत वेदई ग्रामपंचायतच्या माजी ग्राम सचिव सुजाता झा सादाबादचे प्रांताधिकारी संजय कुमार व वेदईचे सरपंच मोहित चौहान यांचे अत्यंत मोलाचे सहाय्य झाले.
तब्बल पाच महिने घर आणि कुटुंबापासून दुरावलेली मिना ज्या क्षणी पती सोनु आणि वडिल किशोरी राम यांना भेटली तेव्हा तीच्या अश्रुंचा बांध फुटला.आणि संविता आश्रमात उपस्थीत कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले. निरोप देते वेळी संस्थेचे विश्वस्त किसन चौरे,आशिष कांबळी, विजया कांबळी, आरती वायंगणकर, सुवर्णा कोकरे, प्रतिक्षा चव्हाण ,मयुरी परब हे उपस्थीत होते.

error: Content is protected !!