समानवता आणि सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
तळेरे (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी तळेरे परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी, प्रशिक्षक रश्मी दाभोलकर, पत्रकार निकेत पावसकर, पूनम महाडिक आदी उपस्थित होते.
यावेळी शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकूण 56 महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर प्रशिक्षणार्थी महिलांनी आयोजक संस्था समानवता ट्रस्टचे सचिव कलमलेश गोसावी, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तर प्रशिक्षक रश्मी दाभोलकर यांना साडी, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांकडून रश्मी चव्हाण, सौ. आडोलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना कमलेश गोसावी म्हणाले की, आमच्या संस्थेच्या माध्यमातून केवळ प्रशिक्षण घेऊ नका. तर त्यातून स्वावलंबी बना. वेगवेगळ्या प्रशिक्षणातून आपली वेगळी संकल्पना मांडून स्वतः चा व्यवसाय सुरू करा. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन कमलेश गोसावी यांनी केले.












