वैभववाडी तालुक्याची उ.बा.ठा. शिवसेनेची प्रमुख बैठक संपन्न

जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

वैभववाडी तालुक्यात केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभेत तालुका बैठका तसेच गाव दौरा बैठका घेण्यात येत आहेत. आज वैभववाडी तालुक्यातील पढाधिकारी व शिवसैनिकांची प्रमुख बैठक संपन्न झाली.यात संघटना बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यातवैभववाडी तालुका संघटक पदी लक्ष्मण रावराणे, उपतालुका प्रमुख पदी रमाकांत मोरे, उपविभाग संघटक पदी संतोष शेलार, महिला तालुका संघटक पदी दिव्या पाचकुडे, लोरे विभाग संघगक पदी विजेंद्र रावराणे, महिला उपविभाग संघटक पदी वैदेही गुरव, शहर प्रमुख पदी रणजित तावडे, शहर संघटक पदी सुनील रावराणे, जांभवडे शाखाप्रमुख पदी योगेश गुरव, आखवणे गुरववाडी शाखाप्रमुख पदी रवींद्र गुरव, नावले शाखाप्रमुख पदी अनिल कदम, आचिर्णे शाखाप्रमुख पदी धुलाजी काळे, जांभवडे महिला शाखाप्रमुख पदी अर्चना राठोड, जांभवडे शाखा महिला संघटक पदी निर्मला बोलये, सोनाली बुथप्रमुख पदी जयवंत पवार,जांभवडे बुथप्रमुख पदी भिवाजी घाटकर, जांभवडे गट प्रमुख पदी राजाराम गुरव, युवासेना कोकिसरे विभागप्रमुख पदी मंथन पांचाळ, युवासेना जांभवडे शाखाप्रमुख पदी राजेंद्र गुरव, युवासेना कोकिसरे शाखाप्रमुख पदी सागर पार्लेकर, नाधवडे युवासेना नाधवडे शाखाप्रमुख पदी किरण पांचाळ यांच्या नवीन नियुक्त्या जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित नियुक्त्या झालेल्या सर्वांचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी मार्गदर्शन केले, लोकसभाचा झालेला पराभव यांची खंत आपल्या सगळयांच्या मनामध्ये आहे, यासाठी आता येणाऱ्या विधानसभेसाठी आपण जोमाने व एकजुटीने कमी करणे गरजेचे आहे. आता वैभववाडीत संघटना बांधणीसाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्याची पं जबाबदारी आता वाढली आहे. सर्वांनी एकजुटीने कमी करूया विजय हा आपलाच आहे.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देखील मार्गदर्शन केले, येत्या 2 महिन्यात आपले महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, व परत एकदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना आपल्या विराजमान करायच आहे. यासाठी आपण गावा – गावात आपली प्रचार यंत्रणा मजबूत केली पाहिजे, एकजुटीने कमी केल्यावर कणकवली विधासभेवर विजय हा आपलाच आहे. असे यावेळी नाईक म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, रज्जब रमदुल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर, तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावस्कर, लक्ष्मण रावराणे, रणजित तावडे, सुनील रावराणे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!