उ.बा.ठा. शिवसेनेच्या नांदगाव, आयनल, कोळोशी, असलदे येथे गाव दौरा बैठका संपन्न

कणकवली उपतालुका प्रमुख पदी भाई साटम यांची नियुक्ती

जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत नांदगाव, कोळोशी, आयनल, असलदे येथे गाव दौरा बैठका घेण्यात आल्या, यावेळी विभागातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी कणकवली उपतालुका प्रमुख पदी भाई साटम यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली. उपतालुका पदी निवडणूक झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील रखडलेल्या विकास कामांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आश्वासन दिले की येत्या 2 महिन्यात आले महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यासाठी आपण जोमाने काम करून येणाऱ्या कणकवली विधासभेवर विजयाचा भगवा फडकवूया. व प्रत्येक गावातील रखडलेली विकास कामे आपण मार्गी लावूया.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, विभागप्रमुख तात्या निकम, नवनिर्वाचित उपतालुका प्रमुख भाई साटम, आबू मेस्त्री, मज्जीद बटवाले, राजा नावळेकर, महमद साठविलकर, अब्दुल नावळेकर, अफझन बाटवाले, राजा म्हसकर, अरुण बापर्डेकर, प्रफुल्ल तोरस्कर, मंगेश परब, समीर कुंभार, बाळा सातोजे, अनिल बांदेकर, मुस्ताक काझी, फिरोज साठविलकर, विनायक कांदलकर, संदीप घाडीगांवकर, देवेंद्र दहिबावकर, सुंदर साटम, भगवान मसुरकर, आदेश ओटवकर, सतीश घाडीगावकर, अतुल गुरव, सिद्धांत तांबे, अनंत शेलार, संजय डगरे, सुरेश मेस्त्री, लक्ष्मण लोके, विजय डामरे, प्रकाश पाताडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!