सुभाष पाटील यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला १५००० /- रुपये किमतीची पुस्तके भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नडगिवे गावचे सुपुत्र तथा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे दक्षिण मुंबई विभागाचे उपाध्यक्ष सुभाष धोंडू पाटील यांनी खारेपाटण हायस्कूलला त्यांच्या २८ ऑगस्ट या वाढदिवसानिमित्त सुमारे १५००० /- रुपये किमतीची पुस्तके भेट दिली. सुभाष पाटील हे खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचे एस सी सी १९८२ – ८३ बॅच चे माजी विद्यार्थी असून खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.तसेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई येथील पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत व सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण हायस्कूलला आपण ही शालेय विद्यार्थ्यांकरिता पुस्तके शाळेला भेट दिल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संचालक मंडळ तसेच खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक वृंद यांनी शाळेचे माझी विद्यार्थी सुभाष पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!