तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिली माहिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकी लक्षात घेता व जिल्ह्यातील पक्ष वाढीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने पक्षात काही संघटनात्मक बदल केले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण,कासार्डे, फोंडा,कलमठ या प्रमुख विभागातील पंचायत समिती विभाग निहाय नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी नुकत्याच कणकवली तालुका मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर व प्रभारी संतोष कानडे यांनी संयुक्तिक जाहीर केल्या असून यामध्ये भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेले पदाधीकारी पुढील प्रमाणे – खारेपाटण – जयदीप विजय देसाई, तळेरे – निवृत्ती श्रीधर पवार, कासार्डे – श्रीपत गणपत पाताडे, नांदगाव – रघुनाथ दामाजी लोके, लोरे नं.ब १ – सुनील मधुकर राणे, फोंडा – अमित अरविंद चव्हाण, वरवडे – दिलीप तिरलोटकर, कलमठ – विजय चिंदरकर या सर्व नुतून पदाधिकाऱ्यांचे भाजप पक्षाचे वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.













