आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठाचे कार्यकर्ते संदीप घाडी रामचंद्र वेद्रूक,सुरेश येझरकर, अक्षय येझरकर, आशिष येझरकर, प्रशांत घाडी, यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बापर्डे जुवेश्वर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार तालुका प्रभारी अमोल तेली, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, सरपंच संजय लाड, अजित राणे, संदीप नाईक धुरे, अनघा राणे हरिश्चंद्र नाईक धुरे आधी पदाधिकारी उपस्थित होते.














