वीज वाहिन्यांवर झाड पडून वैभववाडी रेल्वे स्टेशनजवळील वीज खांबासह डी. पी. कोसळून पडली

वैभववाडी (प्रतिनिधी) : वीज वाहिन्यांवर  झाड पडल्यामुळे वैभववाडी रेल्वे स्टेशनजवळील वीज खांबासह डी. पी. कोसळून पडली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. त्यामुळे स्टेशनं परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. 

वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेर वीज वितरण कंपनीची स्टेशनसाठी डी. पी. आहे. सायंकाळी अचानक वीज वाहिनीवर झाड पडल्यामुळे डी. पी. असलेले वीज खांब डी. पी सह कोसळले. या नजीक एक स्टॉल असून या ठिकाणी प्रवासी व रिक्षा चालक नेहमी बसलेले असतात मात्र पोल कोसळण्याच्या काही क्षण अगोदर रेल्वे प्लॅटफॉर्मवर ट्रेन आल्यामुळे रिक्षाचालक व प्रवासी तिथून उठून गेले आणि पोल पडले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

वीज वितरण कंपनीने वीज खांब उभे करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.शुक्रवारपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री चव्हाण यांनी दिली आहे.

error: Content is protected !!