वनपाल श्रीकृष्ण परीट यांच्या कडून पहाणी
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथील भूतोबाचा माळ येथे नाचणी आणि भातपीक यांची गव्यारेड्यानं कडून गेलें काही दिवसापासून सतत नुकसानी होत आहे. आज मालवण वनपाल श्रीकृष्ण यांच्या पथकाने यांची पहाणी केली.
यावेळी धमापूर वनरक्षक शरद कांबळे, शेतकरी पुरुषोत्तम साईल, उदय पाडावे, प्रविण परब, गुरुदास परब, मधुकर कदम, रामचंद्र साईल, लक्ष्मण साईल, भक्तेश गोलतकर, उमेश साईल, तुळशीदास चव्हाण आदी उपस्थित होते.












