तळेरे (प्रतिनिधी) : शशिकांत इंगळे हे आपल्या वडिलांना आजारी असल्या कारणाने ओरस येतील जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करून घरी डबा घेऊन येतो असे सांगून आपल्या आईला वडिलांकडे सोडून घरी येत असताना आपल्या ताब्यातील MH 08-AF-1010 डस्टर या कंपनीची कार त्यांचे मोठे बंधू आण्णाप्पा इंगळे हे चालवत असताना हुंबरट हायवे येथे येताच अचानक कुत्रा आढावा आला कुत्र्याला वाचवण्यासाठी गाडी रस्त्याच्या बाहेर ओढली असता गाडीचे दोन्ही टायर फुटून गाडी 100 मीटर झाळीत जाऊन थांबली गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने जिवीतहानी टळली त्याच बरोबर कारमध्ये शशिकांत इंगळे व त्यांचे कुटूंब होते कार मधील व्यक्तिना किरकोळ दुखापत झाली असून घटना समजताच घटनेच्या वेळी तात्या निकम कृष्णा इंगळे अनिल इंगळे यांनी धाव घेत मदत केली.