चौके (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संवेद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने काळसे येथे महिलांसाठी एक दिवशीय अगरबत्ती प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात प्रशिक्षक रश्मी दाभोलकर यांनी अगरबत्ती निर्मितीच्या विषयीची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत या उद्योगातील व्यावसायिक संधींची महिलांना माहिती दिली. महिलांनी प्रत्यक्ष सहभागी होत प्रशिक्षण जाणून घेऊन अगरबत्तींची निर्मिती केली. सदर प्रशिक्षणास गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तत्पूर्वी प्रशिक्षणाचे उद्घाटन शुभदा विनायक गोसावी यांच्या शुभहस्ते झाले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता स्नेहांकिता सावंत, संजय गोसावी आदींनी मेहनत घेतली. अशा प्रकारची प्रशिक्षणातून महिलांना व्यवसायभिमुख सक्षम बनवून आर्थिक सबल करण्यावर भर असेल असे मत समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संवेद फाउंडेशन सिंधुदुर्गचे सचिव कमलेश गोसावी यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर येणाऱ्या गणपती उत्सवाकरिता ग्रामस्थांनी गावातील महिलांनी बनवलेल्या अगरबत्ती विकत घ्याव्यात, असे आवाहनही कमलेश गोसावी यांनी केले आहे.