ग्रामपंचायत नावळे, रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत नावळे, रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैदयकीय शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले आहे. या वेळी मोतीबिंदू, कान नाक घसा, रक्त तपासणी, महिलांच्या गर्भाशया संबधी समस्या आदी आजारांची मोफत तपासणी होणार आहे. या संबधी शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या, पिवळ्या व केशरीरेशन कार्ड धारक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले जाणार आहेत. तरी गरजु रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सरपंच स्नेहल गुरव रोटरीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी केले आहे.












