भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ – ३० वाजता भाजपा तालुका कार्यालयात महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती अध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

शासनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना वेंगुर्ले शहरात प्रभावी पणे राबविण्यात आल्यामुळेच बहुसंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळाला , या त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा च्या वतीने सत्कार आयोजित केल्याचे मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले.

error: Content is protected !!