फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय वसंत आग्रे यांचा वाढदिवस आज फोंडाघाट येथे अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८:३० वाजता फोंडाघाट विकास सेवा सोसायटी लिमिटेडच्या नूतन बांधकामाचे भूमिपूजन संजय आग्रे व संजना संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर आग्रे यांचा वाढदिवसही या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
यानंतर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीमध्ये देखील वाढदिवस साजरा करण्यात आला, तसेच फोंडघाट एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष प्रसंगी उपस्थितांनी आग्रे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्य दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होत असून, त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास घडविण्याच्या दिशेने कार्य सुरू आहे.
















