विठ्ठलादेवी पोलीस पाटील पदी स्वप्नील नारकर यांची नियुक्ती

भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर यांनी रिक्तपोलिस पाटील पद गणेशचतुर्थी पूर्वी भरण्याची केली होती मागणी

तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विठ्ठलादेवी गाव पोलीस पाटीलपदी स्वप्नील जयवंत नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विठ्ठलादेवी गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्ती गणेशोत्सव सणापूर्वी करावी अशी आग्रही मागणी भाजपा तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी केली होती. निवड झालेल्या पात्र उमेदवारांमधून पोलीस पाटील नियुक्ती मागील काही प्रलंबित होती. अखेर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी विठ्ठलादेवी गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटीलपदी स्वप्नील नारकर यांना नियुक्ती दिली आहे. स्वतंत्र पोलीस पाटील मिळाल्यामुळे प्रशासकीय कामकाज, विविध दाखले, महसूल तसेच पोलीस प्रशासनाची कामे करताना सोयीचे होणार आहे.

error: Content is protected !!