गणेश मंडळाच्या मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे दोघांच्या डोळ्याला गंभीर दुखाप
पोलीस कर्मच्याऱ्याच्या डोळ्याळा सूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शनिवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं.मात्र,आगमनाच्या वेळी कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. मिरवणुकीत झगमगाट, आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या ‘लेझर शो’पाहायला आलेल्या कोल्हापुरातील उचगावमधील तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला, तर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली. दोघांनाही उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.को डॉल्बीचा दणदणाट आणि आसमंत व्यापून टाकणाऱया ‘लेझर शो’च्या झगमगटात शनिवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुका निघाल्या होत्या, याच आगमन सोहळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली. ‘लेझर शो’च्या किरणांमुळं मिरवणूक पाहायला गेलेल्या 21 वर्षाच्या तरुणाच्या डोळ्याला जखम झाली. आदित्य बोडके असं या तरुणाचं नाव आहे.
पोलीस कर्मच्याऱ्याच्या डोळ्याळा सूज
कोल्हापूरमध्ये अशीच एक दुसरी घटना समोर आली. आगमन मिरवणुकीत पोलीस बंदोबस्तासाठी असलेले हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाली. त्यांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
धोकादायक लेझरवर कायमची बंदी आणा
“लेझर किरणांची तीव्रता अधिक असल्यामुळं रेटिनाला सर्वाधिक धोका आहे. अशा मिरवणुका टाळणं किंवा या किरणांकडं बघूच नये, अशी दक्षता घ्यायला हवी. शासनानं या धोकादायक लेझर किरणांच्या वापरावर तत्काळ बंदी घालावी,” असं मत कोल्हापुरातील नेत्र विकारतज्ञ डॉ. चिंतामणी खरे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना व्यक्त केलं.