मसुरे (प्रतिनिधी) : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रांगना रनर्सच्या सदस्यांनी चमकदार कामगिरी केली. अतिशय अवघड अशा या स्पर्धेत देश विदेशातून हजारो स्पर्धक सहभाग घेतात. यावर्षी एकूण 8 हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. यशस्वी स्पर्धकांना तीन विभागात मेडल देण्यात येतात. स्पर्धा दोन तासात पूर्ण केली तर सुवर्ण, अडीज तासात पूर्ण केली तर रजत व नंतर पूर्ण करणाऱ्यांना रौप्य पदक देण्यात येते. पाच वर्ष भाग घेतला तर डबल मेडल देण्यात येते.
अशा या स्पर्धेसाठी दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रांगना रन्नर्स हा डॉक्टरांचा ग्रुप सहभाग घेतो. त्यात काही नॉन मेडिको ही मित्र सोबत जातात. यावर्षी 8 जणांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या स्पर्धेची तयारी म्हणून रनिंग मधील वेगवेगळ्या पद्धतीचा तीन महिने सराव करावा लागतो. सुरुवातीपासून पूर्ण साडेदहा किलोमीटर पर्यंत घाट रस्ता असल्यामुळे स्पर्धकांचा खरा कस लागतो. पूर्ण सातारा शहरातील नागरिक लहान थोर मंडळी रनर ना प्रेरणा देण्यासाठी दोन्ही बाजूने टाळ्या वाजवून स्वागत करत असतात. मार्गावर ढोल ताशांची पथके रन्नर्स चा जोश वाढवत असतात. स्वागत करत असतात.स्पर्धेत डॉ प्रफुल आंबेरकर (2.58), डॉ. सोमनाथ परब (2.44), डॉ रोहन कोरगावकर (2.06), डॉ संचित खटावकर (2.12), डॉ. रवी बुरुड (2.58), डॉ. गुरुप्रसाद सौदत्ती (3.51), डॉ गौरी परुळेकर (3.33), प्रशांत माळकर (2.54) यांनी ही रन यशस्वीरित्या पूर्ण केली.
डॉ सोमनाथ परब यांनी यावेळी पाच वेळा ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांना डबल मेडल प्राप्त झाले.रांगना रन्नर्स, रांगना रागिणी, ब्युटीज ऑन व्हील चे सर्व सदस्य व इतर मित्र परिवाराने त्या सर्व रन्नर्स चे अभिनंदन केले. सर्वांनी फिटनेस राखण्यासाठी व्यायामाकडे लक्ष द्यावे आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रोज अर्धा तास द्यावा. रनिंग, सायकलिंग, योगा, ट्रेकिंग काहीतरी करावे, आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे पालन करावे. फिटनेस अजमावण्यासाठी अधून मधून स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे सर्व रनर्सकडून आवाहन करण्यात येत आहे.