सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनांची बैठक धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या संदर्भात बैठक संपन्न झाली.
त्यावेळी उपस्थित कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष नागेश ओरसकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, सावंतवाडी तालुकाध्यक्ष धर्मेंद्र सावंत, बांदा शहराध्यक्ष राजेश बांदेकर, देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, रवींद्र कांदळगावकर, सिद्धार्थ नाडणकर, रवींद्र चिंदरकर, रविकांत चांदोसकर, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे सचिव सुनील पाताडे, व अन्य रिक्षा चालक उपस्थित होते.