शिबिराचा लाभ घेण्याचे डॉ. सिद्धेश सकपाळ आवाहन
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक टेबं बाजार येथील डॉ. सिद्धेश सकपाळ, हार्मोनी मेडिकेअर येथे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत लहान मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बालरोगतज्ञ येऊन मुलांची तपासणी करणार आहेत. तसेच या शिबिरात लहान मुलांचे आयुषमान कार्ड, महात्मा फुले योजना यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे व त्याविषयी माहिती दिली जाणार आहे. उपस्थित पालकांची तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत कार्डीओग्राम काढून दिला जाणार आहे. तरी सर्व ग्रामस्थानी व बालकांच्या माता पित्यांनी बालकांना शिबिरात आणून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सिद्धेश सकपाळ यांनी केले आहे.