कसाल वनपाल अनिल चव्हाण यांचे निधन

उद्या सकाळी 9 वाजता होणार अंत्यसंस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कसाल वनपरिमंडळ चे वनपाल अनिल रामचंद्र चव्हाण ( वय 54, मूळ गाव फोंडाघाट बावीचेभाटले ) यांचे गुरुवार 19 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर गोवा बांबूळी येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 19 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. अत्यंत मृदू आणि मनमिळाऊ स्वभावाचे वनपाल अनिल चव्हाण यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबियांसह वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या मृतदेहावर उद्या 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, विवाहित बहीण, वहिनी, पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने फोंडाघाट बावीचे भाटले गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!