काळसे मधील रुपेश पावसकर बेपता

मालवण (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथील रुपेश रवींद्र पावसकर (वय ३८) हा तरुण १३ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. घरात कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडून आलेला नाही. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ संदीप पावसकर याने येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. या व्यक्तीविषयी कोणास माहिती मिळाल्यास त्यांनी मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कट्टा पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी प्रकाश मोरे अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!