देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चाफेड बांदेवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी श्री.संदीप साटम, सुभाष नार्वेकर, राजेंद्र शेटे, अमित साटम, गणेश तांबे, सुनील कांडर, सत्यवान भोगले, सिद्धेश भोगले, मयुरेश मिराशी, विशाल राणे, सुहास राणे उपस्थित होते. या प्रवेशामुळे संपूर्ण चाफेड गावच भाजपमय झाले आहे आमदार नितेश राणे यांनी आपण विकासाच्या प्रवाहात सामील झाला आहात अशा शब्दात सर्व नागरिकांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे.