सडुरे अरुळे परिसरात ढगफुटी ; भातशेती चे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सडूरे अरुळे परिसरात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पावसाने नेमके काही नुकसान झाले का याबाबत उशिरापर्यंत नोंद नाही.

सध्या तालुक्यात  दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी सायंकाळी तालुक्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर सडूरे राणेवाडी,  चव्हाणवाडी,अरुळे परिसरा ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळला. यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पाणी रस्त्यावर आल्यामुळे सडूरे चव्हाणवाडी राणेवाडी येथे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. नदी ओहळातील पुराचे पाणी भात शेतीत घुसल्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!