आचरा येथे माजी खासदार डॉ. निलेश राणे पुरस्कृत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा स्पर्धा…!

सिने अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती

विजय (बाबू) कदम मित्र मंडळाचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : ईनामदार श्री देव संस्थान आचरा येथे 39 दिवसाचा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक 9 वाजता श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथे माजी खासदार डॉ. निलेश राणे पुरस्कृत व विजय उर्फ बाबू कदम मित्रमंडळ आयोजित लाडक्या बहिनीनसाठी होम मिनिस्टर “खेळ रंगला पैठणीचा” हि स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे असून प्रथम येणाऱ्या 50 महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून सहभागी स्पर्धेकांना भेट वस्तू दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग कलाभूषण सिने अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी या कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण असणार आहेत.  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विजय उर्फ बाबू कदम-9421574700 व तेजस्विता केळुस्कर – 9404457835 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विजय उर्फ बाबू कदम मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!