खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

खारेपाटण(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण व भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधरण जिल्हा वार्षिक योजना – सन २०२२-२३ मधून खारेपाटण विभागासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.यापैकी खारेपाटण शहरामधील मधील विविध विकास कामांचा कामांचा शुभारंभ आज सायंकाळी आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी भजपा कणकवली तालुका प्रमुख संतोष कानडे,माजी सभापती दिलीप तळेकर,मनोज रावराणे,माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार,माजी पं.स सदस्य सौ तृप्ती माळवदे,खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच श्री रमाकांत राऊत, माजी उपसरपंच इस्माईल मुकदाम, खारेपाटण भाजप पदाधिकारी श्री भाऊ राणे, सुधीर कुबल,राजेंद्र वरुनकर,विजय देसाई,शमशुद्दिन काझी,पप्पू रायबागकर,विट्टल गुरव,किशोर माळवदे,विजय देसाई व खारेपाटण ग्रा.प.सदस्य किरण कर्ले,जयदीप देसाई, गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, सौ.मनाली होनाळे, शीतिजा धुमाळे,दक्षता सुतार,अमिषा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ ते दुर्गादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरन करणे तसेच खारेपाटण चंद्रप्रभू जैन मंदिर कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व खारेपाटण रामेश्वर नगर कॉलनी रस्ता खडीकरण व डांबरीकरन करणे आदी खारेपाटण मधील प्रमुख विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज श्रीफळ फोडून करण्यात आले.तर मंजूर झालेल्या अन्य विकासकामांचा शुभारंभ देखील लवकरच केला जाईल असे देखील यावेळी माजी जि.प सदस्य व भा पदाधिकारी श्री बाळा जठार यांनी यावेळी सांगितले. खारेपाटण शहरात विविध विकास कामांचा धडाका आमदार नितेश राणे यांनी भाजप पक्षाच्या माध्यमातून लावल्याने नागरीकामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!