कासार्डेतिठा येथे श्री सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळाचा आजपासून नवरात्रौत्सव

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथिल श्री सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळाचा नवरात्रौत्सव बुधवार दि.2 ऑक्टो. 2024 ते रविवार दि. 13 ऑक्टो. 2024 पर्यंत भरगच्च कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मंडळ १९ व्या वर्षी पर्दापन असून विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त गुरुवार दि. ३ ऑक्टो. स. १०: ०० वा. कासार्डे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीरंग पाताडे यांच्या शुभहस्ते श्री.दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना सायं.७:०० वा. श्री गांगेश्वर प्रासा. भजन मंडळ, तळेरे घाडीवाडी बुवा कु.आर्या गणेश घाडी भजन,सायं.८:०० वा. महादेश्वर प्रासा. भजन मंडळ,नाडण,ता.देवगड बुवा संदिप पूजारे भजन, शुक्रवार दि.४ ऑक्टो. सायं ७:०० वा. स्वयंभू प्रासा. भजन मंडळ,कासार्डे द.गावठण बुवा प्रमोद शेटये भजन, शनिवार दि. ५ ऑक्टो. सायं. ४ :००वा. खास लहान मुलांमुलींसाठी फनीगेम, सायं ७:०० वा. श्री गांगेश्वर प्रासा. भजन मंडळ,कासार्डे धुमाळवाडी बुवा श्री. हरी पालव भजन, रात्रौ.८:०० वा. जय हनुमान प्रासा. भजन मंडळ,तळेरे बुवा आकाश वळंजू भजन, रात्रौ.१०:०० वा. किमया अंतर्मनाच्या हिप्नोटीझम संभाजी भराडे सर याचा कार्यक्रम,रविवार दि.६ ऑक्टो. स. ८:०० वा. रक्तदान शिबीर,दु. ३:०० वा. खापरादेवी फुगडी मंडळ, ओझरम मापारवाडी, दु. ३ : ३० वा. खास महीलांसाठी होम मिनिस्टर व लकी कूपन सोडत,सायं.७:०० वा.श्री समर्थ कृपा भजन मंडळ,ओझरम बुवा संतोष राणे भजन होणार आहे.

तसेच सोमवार दि.७ ऑक्टो. सायं.७:०० वा. स्वयंभू प्रासा.भजन मंडळ,कासार्डे उ.गावठण बुवा संजय पाताडे भजन, मंगळवार दि.८ ऑक्टो. रात्रौ.८:०० वा.श्री आवळेश्वर प्रासा.भजन मंडळ,कासार्डे तांबळवाडी बुवा विजय पाताडे भजन, रात्रौ.९:०० वा. ग्रुप वेशभूषा स्पर्धा, बुधवार दि.९ ऑक्टो. रात्रौ.८:०० वा. श्री गांगेश्वर प्रासा.भजन मंडळ,तळेरे बुवा संतोष तळेकर भजन,रात्रौ.९:०० वा. वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा, गुरुवार दि.१०ऑक्टो. सायं ७:०० वा. साईनाथ प्रासा.भजन मंडळ,ओझरम बुवा. सुधाकर राणे भजन,शुक्रवार दि.११ ऑक्टो. दुर्गाष्टमी निमित्त स.१०:०० वा. श्री सत्यनारायण महापूजा,दु.१ ते ३ वा. भंडारा महाप्रसाद दु. ३ :०० पासून हळदीकुंकु समारंभ,दु.३ : वा. श्री.देव भैरव जोगेश्वरी महीला फुगडी मंडळ,कुडाळ भैरववाडी फुगडी नुत्य, सायं. ५:०० वा. दत्तात्रय प्रासा.भजन मंडळ,कासार्डे भोगले पारकरवाडी भजन, सायं ६:०० वा. स्वयंभू प्रासा.भजन मंडळ,कासार्डे द.गावठण बुवा प्रकाश पाताडे,सायं. ७ वा. दिंडी भजन स्पर्धा व जेष्ठ वारकरी बुवांचा सत्कार,शनिवार दि.१२ ऑक्टो. रात्रो ८:०० वा. अष्टविनायक प्रासा.भजन मंडळ बावशी बुवा श्री ओंकार नार्वेकर भजन,रविवार दि.१३ ऑक्टो. सायं. ६:००वा. कासार्डे तिठठा ते कासार्डे जांभूळवाडी गणेश कोंड श्री.दुर्गामूर्ती विसर्जन सोहळा पार पडणार आहे तसेच जिल्हास्तरीय रोल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये व श्री सिध्दीविनाय नवरात्र उत्सवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!