मसुरे (प्रतिनिधी) : आर.आर. पाटील सुंदर गाव 2022-23 स्पर्धेत मालवण तालुक्यातून वायंगवडे ग्रामपंचायत प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतला 87 गुण प्राप्त झाले आहेत. सदर ग्रामपंचायतचे परीक्षण सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केले होते.प्रथम क्रमांक आल्यामुळे 10 लाख रुपयांचे पारितोषिक या ग्रामपंचायतला मिळणार आहे. बक्षीसाच्या माध्यमातून गाव पातळीवर नवीन विकास कामांसाठी जास्तीचा निधी प्राप्त होणार आहे. मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्या बद्दल सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, ग्राम सदस्य विष्णू मेस्त्री, सुषमा परब, सानिका राणे, सानिका सकपाळ, आनंद सावंत, मयुरी परब, कर्मचारी स्वप्नील सुद्रिक, भक्ती परब, विनेश परब सर्व ग्रामस्थ यांचे अभिनंदन होत आहे.