कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील कुंदेवाडी येथील कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवार 3 ऑक्टोबर ते शनिवार 11 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन येथील सागर गवाणकर यांच्या घराजवळील पटांगणावर करण्यात आले आहे.नवरात्री उत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.यानिमत्त रोज सायंकाळी मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, स्थानिक भजने, दांडीया आदी कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमांचा लाभ तरंदळे गावातील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.