मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी अनिकेत तर्फे यांची निवड

जिल्हा संपर्क अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मोरे यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी अनिकेत अनंत तर्फे यांची निवड करण्यात आली. मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संघटक यश सरदेसाई, प्रशांत कनोजिया यांच्या मार्गदर्शनाने. अनिकेत तर्फे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी तर ज्ञानेश्वर मोरे यांची जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अनिकेत तर्फे हे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मधे गेली काही वर्षे सिंधुदूर्ग उपजिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना स्वतःच्या जोरावर अनेक कामे केली मुंबई गोवा मिडल कट बंद करून दाखविले, कणकवली तालुक्यातील इंग्लिश मिडीयम च्या शाळेवरील इंग्रजीत असलेलं बोर्ड मराठीत केली. कुर्ली गावातील नदीच्या दुरुस्तीचे काम, नांदगाव एटीएम मधे मराठी भाषा, अशी अनेक काम अनिकेत तर्फे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!