कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड
तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावून जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.त्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदरचा संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. क्रीडा कार्यालयमार्फत जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे १ ते ३ ऑक्टोबर रोजी पार पडली. १९ वर्षाखालील मुलींच्या संघात समीक्षा पाळेकर,दिव्या पाळेकर,क्षितिजा काळे,नेहा कदम, रुचिता पाळेकर,संजीवनी सावंत,रिद्धी पाळेकर, सिद्धी पाळेकर, प्राची परब,भाविका पाळेकर,सानिया पाळेकर,तृप्ती पाळेकर, कस्तुरी पाळेकर,अनुष्का पाळेकर, प्रेरणा गाडे आदी खेळाडूंचा समावेश आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक प्रा.दिवाकर पवार,प्रा.ममता डांगमोडेकर,प्रा.विनायक पाताडे,नवनाथ कानकेकर, वैष्णवी डंबे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे,शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी. बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही राणे यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विजेत्या संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.