कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे महिलांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक १०मार्च २०२३रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कामगार व कामगार कुटुंबीय महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी केले. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या नीलम पालव, कविता राणे नगरसेविका कणकवली नगरपंचायत,संयोगीनी महिला सेवा मंडळ अध्यक्षा दीपा सरुडकर,महिला बचत गट प्रमुख दिव्या साळगांवकर,करूणा घाडीगांवकर सरपंच वरवडे, केंद्र संचालक संतोष नेवरेकर उपस्थिती होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या सत्कार मुर्ती दिपा प्रकाश दळवी कामगार कुटुंबीय,यशश्री नंदकुमार मसदेकर कामगार झांटये काजू फॅक्टरी मालवण,शमिका अमित वेंगुर्लेकर एम एस ई बी मालवण,मनस्वी मारूती मेस्ञी राठीवडे कामगार कुटुंबीय,पूनम सुनिल जाधव कामगार अमृता काजू फॅक्टरी वेंगुर्ले ,दिक्षा दर्शन हिंदळेकर कामगार रा.प.म मालवण वाहक,सिंधु गोरख गायकवाड कामगार रा.प.म सावंतवाडी वाहक ,सिद्धी विनायक शेटये कामगार कुटुंबीय,या आठ महिलांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला .सत्कार मुर्ती पैकी सिंधु गायकवाड यांच्या मनोगताने मान्यवर व प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी रित्या पारपाडण्यासाठी सुप्रीया मोरये केंद्र महिला कल्याण सहाय्यीका तसेच केंद्र सेविका सविता देऊलकर यांनी सहकार्य केले

error: Content is protected !!