रक्तदान शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग
वैभववाडी (प्रतिनिधी) : आज संपूर्ण राज्यात शासकीय कर्मचारी वर्गाकडून जुन्या पेन्शन योजनेसाठी बंद पुकारला आहे. संपुर्ण राज्यात सर्वत्र कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना वैभववाडीत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोखे आंदोलन होताना पहायला मिळाले. वैभववाडीत महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, रोटरी क्लब वैभववाडी तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला आहे.
या प्रसंगी संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे, प्राचार्य डॉ काकडे, रोटरी क्लबचे सचिव संजय रावराणे, खजिनदार प्रशांत गुळेकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पडवळ व या रक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ माणिक चौगुले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण सज्जनकाका रावराणे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल भोसले सर यांनी केले.