मडुरे नदीपात्रात मगरीने बकरीचा घेतला बळी

10 हजारांचे नुकसान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मडुरे मोरकेवाडी येथील शेतकरी विजय गवंडी यांच्या गाभण बकरीवर मगरीने हल्ला बळी घेतला. बकरींचा कळप पाण्यासाठी नदीवर आला असताना दबा धरुन बसलेल्या मगरीने बकरीवर हल्ला केला. या दुर्घटनेत गवंडी यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड हे पंचनाम्यासाठी सावंतवाडीहून रवाना झाले आहेत. मगरींच्या दहशतीने शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मडुर्‍यातील नदीर शेकडो मगरींचा वावर आहे. गावात मगरींनी पाळीव जनावरांवर हल्ले करण्याच्या गेल्या १० वर्षात अनेक घटना घडल्या आहेत. यात शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!