शिवसेना खारेपाटण-तळेरे विभाग महिला संघटक पदी प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच शिवसेना पक्ष खारेपाटण -तरेळे विभागाच्या महिला संघटक पदी निवड करण्यात आली आहे. याबवातचे नियुक्ती पत्र सिंधुुदूर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख व पक्षाचे आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे पक्षाच्या झालेल्या मेळाव्यात देण्यात आल्याची माहिती कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी दिली.

कणकवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक,शिवसेना नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत,जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे,महीला जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकर,तालुका अध्यक्ष भूषण परुळेकर,शेखर राणे, उपतालुका प्रमुख मंगेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभहस्ते प्राची ईसवलकर यांना अधीकृत नियुक्ती पत्र पक्षाच्या वतीने देण्यात आले.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन पक्षाची स्थापना केल्यानंतर लगेचच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण गावच्या ग्रामपंचायत मध्ये शिंदे गटाच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून त्या निवडून आल्या होत्या. सोबत तीन ग्रामपंचायत सदस्य सुद्धा जिल्ह्यातील पक्ष नेत्रुवाच्या मार्गदर्षनाखाली निवडून आणले होते. या सर्व पार्श्वभमीवर खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांची खारेपाटण – तळेरे विभाग शिवसेना महीला संघटक पदी निवड करण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नेते सुधीर सावंत जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली व महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकर व तालुका अध्यक्ष भूषण परुळेकर उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या मार्गदर्शना खाली खारेपाटण विभागासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने महिला संघटन वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून सर्वांना विश्वासात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित शिवसेना खारेपाटण – तळेरे विभाग महिला संघटक प्राची ईसवलकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!