दोन नंबर वाल्यांनी सतीश सावंतांवर टीकेची पुन्हा हिम्मत करू नये

आपलं वय किती व आपण बोलतो किती याच आत्मपरीक्षण करा

अन्यथा दोन नंबर धंद्यातील कुंडली बाहेर काढणार

दारिस्ते युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर यांचा साकेडी उपसरपंच यांना इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : निवडणुकीत निवडून न येता केवळ नशिबाची साथ घेत उपसरपंच बनलेल्या साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी स्वतःला 52 पानी पत्त्यातील जोकर समजून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका करू नये. सतीश सावंत यांचा राजकारणीतील वय आणि प्रज्वल वर्दम यांचं जन्माला आल्यापासूनच वय हे देखील सतीश सावंत यापेक्षा कित्येक पटीने कमी असेल. केवळ फेसबुक आणि व्हाट्सअप ह्या पुरते मर्यादित असणाऱ्या वर्दम यांनी ज्या ठिकाणी जेवणावळी उठवल्या त्या ठिकाणी त्यांचे कोणते धंदे चालतात ते उघड करायला लावू नये. सतीश सावंत हे शेतकरी नेते म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. मात्र कलमठला राहून आयत्या बिळावर नागोबा बनणाऱ्यांना शेती आणि राजकारणातील जनतेशी असलेली नाळ काढणार नाही. सतीश सावंत यांच्यावर टीका करत असताना आपली कुवत न ओळखता टीका करणाऱ्या वर्दम यांनी अवैध गुटखा विक्री तसेच बंद घरामध्ये बसणाऱ्या रात्रीच्या मैफिलीतील कलाकारांची नावे उघड करायला लावू नये. जर ही नावे उघड झाली तर त्यांचे पद कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकेल. राहता राहिला प्रश्न आमच्या नेत्यांवरील टीकेचा. आपली उंची किती आणि आपण बोलतो किती? याचे आत्मपरीक्षण वर्दम यांनी करावे, कारण त्यांच उपसरपंच पद हे औटघटकेचे असून काही महिन्यांनी त्यांना पुन्हा आपल्या दोन नंबर व्यवसायाकडे वळावे लागेल. असा टोला दारीस्ते युवा सेना शाखाप्रमुख विजय गावकर यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!