ओसरगाव माजी उपसरपंच भाजपला ” हात ” दाखविण्याच्या तयारीत

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे हे अलीकडच्या काळात भाजपात सक्रिय नसून ते लवकरच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपाला हात दाखवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. आमदार नितेश राणे यांना मानणारे बबली राणे भाजपात अलीकडच्या काळात मात्र सक्रिय दिसत नाहीत. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असणारे बबली राणे यांनी यापूर्वी कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी लक्षवेधी घेतलेल्या मतांमुळे कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाची विजयाची गणिते बदलली होती. भाजपा पक्षप्रवेश केल्यानंतरही बबली राणे हे बदलत्या राजकारणात अलीकडच्या काळात सक्रिय नाहीत.मात्र आता पुन्हा स्वगृही राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाऊन राजकारणात बबली राणे ऍक्टिव्ह होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!