विवाहितेस शिवीगाळ व मानसिक त्रास देणाऱ्या सासू,सासरे व पतीवर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे भुसारवाडी येथील विवाहितेस माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी शिवीगाळ व मानसिक त्रास देणारी सासू जमीला नझिर बक्कर वय ५०, सासरे नझिर युसुफ बक्कर वय ५५, पती बिलाल नझिर बक्कर वय ३३ सर्व रा. कोळपे भुसारवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सब्रीना बिलाल बक्कर वय २९ रा. कोळपे भुसारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, तीला सासू,सासरे व पती हे वारंवार माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी शिवीगाळ करून त्रास दिला. तसेच ठाणे जिल्हा येथील प्लॅटचे पैसे भरण्यासाठी वारंवार माहेरून पैसे आण असा तगादा लावला होता.

तसेच पती बिलाल बक्कर याने दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी तिच्या मोबाईलवर व्हाट्स अँप वर तलाख है, तलाख है, तलाख है, तू मेरी जिंदगीसे निकल जा! असा इंग्लिश मेसेज करून बेकायदेशीर तलाख दिला आहे. तर सासू सासरे यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी तीला घरातून हाकलून लावले आहे. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून सासू, सासरे, पती या तिघांवर बी एन एस 86 हुंड्यासाठी छळ, ८६/३/५ मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण २०१९ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!