हायवे टोलमुक्तीसाठी फोंडाघाट मधून नागरिकांच्या सह्यांच्या मोहिमेला होणार सुरुवात

टोलमुक्त कृती समितीचे सहसचिव अनंत पिळणकर यांचा पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळावी यासाठी टोलमुक्त समिती चे सहसचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकारातून 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता फोंडाघाट एसटी बसस्थानकात नागरिकांच्या सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. फोंडाघाट पंचक्रोशीतील नागरिकांनी सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमुक्ती मिळावी आणि सिंधुदुर्गातून टोल हद्दपार करण्यासाठी या सही मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन टोलमुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!