मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे बॅ नाथ पै यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपक भोगटे यानी बॅ नाथ पैं च्या जीवन चरित्राचा आढावा घेतला आणि नाथ पैं च्या विचारा चा मागोवा घेत सेवांगण राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. साळेल प्रभागाचे केंद्रप्रमुख सावंत सर यानी सेवांगणच्या विविध शैक्षाणिक उपक्रमामुळे कट्टा परिसरात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली असल्याचे नमूद करून सेवांगण च्या उपक्रमांची प्रशंसा केली मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री माने यानी बॅ नाथ पै हे लोकोतर संसदपटू असून त्यांच्या विचाराने चालणारी सेवागण ही संस्था मालवणचे भूषण आहे. सतत ४५ वर्ष स्पधी भरवणे ही फारच कौतुकास्पद बाब आहे. याचा उल्लेख करून गुणवंत मुलांचे कौतुक केले. या वेळी मोगरणे शाळेतल वेदा मराठे या ३ री मधल मुलीने
ती फुलराणी या नाटकातील स्वगत सादर केले. यावेळी सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या बाल स्पधी महोत्सवातील २०० गुणवंताना प्रशस्ती पत्र व शैक्षणिक वस्तू देऊन गौरविण्यात आले. वैष्णवी लाड यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व बाळ कृष्ण नांदोस यानी आभार मानले या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, गटशिक्षणाधिकारी माने,
केद्रप्रमुख सावंत, वैष्णवी लाड, बाळ नांदोसकर, चित्रकार हरेश चव्हाण, गीता नाईक, प्रियांका भोगटे, नाईक मॅडम, गावडे सर,
परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.